पुणे : मोठ्या मुलीवर बलात्कार करून गेला जेलमध्ये, जामिनावर सुटल्यावर केला धाकट्या मुलीवर अत्याचार

देहूरोड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोठ्या मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या नराधम सावत्र बापाने जामिनावर सुटल्यावर घरी येऊन धाकट्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना देहूरोडमध्ये उघडकीस आली असून या नराधम बापावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीने शिक्षा भोगताना तात्पुरती सुटका झाल्यावर 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजंदारीवर काम करणारे हे कुटुंब असून पीडित मुलीला तिची आई दवाखान्यात घेऊन गेली होती. त्यानतंर डॉक्टरांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ याची माहिती देहूरोड पोलिसांना दिली. याप्रकरणात देहूरोड येथील डॉक्टरांनीच स्वत: फिर्याद दिली आहे.

चार वर्षापूर्वी हे कुटुंब हाडपसर परिसरात रहात होते. त्यावेळी 14 वर्षाच्या (त्यावेळी 11 वर्षे) मुलीवर आरोपी बापाने बलात्कार केला होता. त्यामुळे त्याला अटक करून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर पीडितेची आई दोन्ही मुलींना घेऊन मिळेल तिकडे काम करत होती. काही दिवस ती तळेगाव दाभाडे परिसरात रहात होती. तेथून महिन्यापूर्वी देहूरोडपरिसरात राहण्यास आली. दरम्यान, नराधम बाप काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटला होता. तो पुन्हा कुटुंबाच्या संपर्कात आला. त्याने घरी आल्यावर 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला.

मुलीच्या आईला ही बाब समजल्यावर तिने मुलीला घेऊन दवाखान्यात गेली. तेथील डॉक्टरांना घडलेली माहिती सांगितली. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना दिली. देहूरोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती समजताच पोलिसांनी पहिल्यांदा नराधम बापाला अटक केली. यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली. दोहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.