बेकायदा गर्भपात करून अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न

मालेगाव (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन- नाशिक येथे अवैध गर्भपात करणारी टोळी सक्रिय झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये एका तरूणीचाही सहभाग आहे. मात्र ही तरूणी फरार असल्याची माहिती मिळते आहे.

मालेगावात अवैध गर्भपात करणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील संशयिताकडून संशयास्पदरित्या खड्डे खणून काही तरी पुरण्याचे नागरिकांच्या निर्दशनास आले. यावेळी नागरिकांनी या संशयिताना तेथून हाकलून लावले. मात्र, या संशयितांनी या खड्ड्यात काहीतरी पुरले. ते अर्भक असू शकते असा स्थानिकांचा अंदाज आहे.

याप्रकरणी किल्ला पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र यात सहभागी असणारी तरुणी फरार झाली आहे. मनमाड रस्त्यावरील एका मळ्यात अवैध गर्भपात पुरण्यात  आल्याची चर्चा आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. खड्डे उकरल्यानंतरच यासंबंधी खरी माहिती समोर येणार आहे.