Video : ‘कोरोना’पासून बचाव करण्याची पद्धत पाहून आश्चर्यचकित झाले आनंद महिंद्रा, व्हिडिओ शेअर करून म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी कुणी काढा पित आहे, तर कुणी व्यायाम करून आपली इम्युनिटी वाढवण्याच्या मागे लागला आहे. परंतु काही लोक कोरोना महामारीदरम्यान नवीन शोधसुद्धा लावत आहेत. अशाच एका शोधाचा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाख वेळा पाहिला गेला आहे.

पाहताक्षणीच हा व्हिडिओ एखाद्या रेस्टॉरंटचा वाटत आहे. या व्हिडिओत तीन लोक कुकरला लावलेल्या पाईपद्वारे वाफ घेत आहेत. तीनही पाईप एका कुकरला जोडले आहेत आणि तिघांमधून वाफ येत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, कुकरच्या पाईपच्या समोर बसलेल्या तीन व्यक्ती कधी नाकाद्वारे तर कधी तोंडाद्वारे वाफ घेत आहेत. वाफ घेऊन एक व्यक्ती उठून गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी दुसरा येऊन बसताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, आम्हाला माहीत नाही हे रेस्टॉरंट कुठे आहे. पण या रेस्टॉरंटच्या मालकाला व्यापारात नावीन्य आणण्यासाठी हार्वर्डला जाऊन शिक्षण घेण्याची गरज नाही. त्याला पाहिल्यानंतर वाटते की, अशाप्रकारे वाफेद्वारे कोरोना व्हायरस नष्ट करण्याचा उपाय केला जात आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर 13 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आहेत, तसचे 1.5 हजार रिट्विट्ससुद्धा आहेत.