लौंगी भुइयांने 30 वर्ष हाताने डोंगर तोडून बनवला कॅनल, आता आनंद महिंद्रा देणार बक्षीस

नवी दिल्ली : बिहारच्या लौंगी भुइयां मांझी यांना आता बहुतांश लोक ओळखतात. त्यांनी आपल्या जीवनातील 30 वर्ष अशा कामात घालवली, ज्यामुळे तीन गावांना मदत होत आहे. बिहारच्या गया येथे राहणारे लौंगी माझी यांनी एकट्याने 30 वर्षापर्यंत पाच किलोमीटर डोंगर खोदला जेणेकरून डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्याद्वारे थेट गाववाल्यांच्या शेतापर्यंत जावे. त्यांच्या या कामाने ग्रामस्थांचे नशीब पालटले आहे. आता त्यांची ही कथा समोर आल्यानंतर लोकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेयरमन आनंद महिंद्रा सुद्धा आहेत.

आनंद महिंद्रा यांनी लौंगी माझी यांना एक ट्रॅक्टर देण्याची घोषणा केली आहे. लौंगी यांनी 30 वर्ष कठोर परिश्रम करत डोंगर कापला आणि त्यावर कालवा बनवला. त्यांनी अगोदरच ठरवले होत की, एक दिवस कालव्याद्वारे पाणी शेतापर्यंत आणायचे. ते रोज या कामासाठी जंगला जात असत. ते येथील कोठिलवा गावात राहाणारे आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना असे करण्यास नाही म्हटले होते. परंतु त्यांनी ऐकले नाही.

नुकतेच ट्विटरवर एक यूजरने रोहिन कुमारने लौंगी माझीचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर करत लिहिले की, लौंगी मांझी यांनी आयुष्याची 30 वर्षे लावून कालवा खोदला. त्यांना आताही काही नकोय, एका ट्रॅक्टरशिवाय. ते म्हणाले, जर त्यांना एक ट्रॅक्टर मिळाला तर त्यांना मोठी मदत होऊ शकते. आनंद महिंद्रा यांना या व्यक्तीचा सन्मान करण्यात गर्व होऊ शकतो.

त्याच्या या ट्विटला आनंद महिंद्रा यांनी प्रतिसाद दिला. आनंद महिंद्रा यांनी यानंतर ट्विट करून म्हटले, त्यांना ट्रॅक्टर देणे माझे सौभाग्य आहे. मी अगोदरच म्हटले की हा कालवा ताजमहल आणि पिरॅमिडप्रमाणे ऐतिहासिक आहे. आम्ही यास आमचे सौभाग्य मानू की त्यांनी आमच्या ट्रॅक्टरचा वापर करावा. रोहिन कुमार आमची टीम त्यांच्यापर्यंत कशी पोहचू शकते.