Andheri by-Election | राज ठाकरेंनंतर शरद पवारांनी सर्व पक्षांना केले आवाहन, भाजपाने उमेदवारी मागे घ्यावी, करून दिली ‘ही’ आठवण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) या त्यांचे दिवंगत पती रमेश लटके (Late MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक निवडणूक (Andheri by-Election) लढवत आहेत. त्यामुळे लटके यांच्या बाजूने सहानुभूती आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र देऊन अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-Election) भाजपाने उमेदवार न देता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पालन करावे, अशी विनंती केली आहे. आता राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ऋतुजा लटके यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर जर मुंडे कुटुंबातील कुणी निवडणुकीला उभे राहणार असेल तर उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक देखील बिनविरोध व्हावी असे सर्व संबंधित पक्षांना मी आवाहन करत आहे.

 

ऋतुजा लटके यांना पाठिंबा देण्यासाठी आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भाजपाला (BJP) उमेदवार मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर संबंधित पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता याची आठवण देखील करुन दिली.

शरद पवार म्हणाले, मला वाटते की अंधेरीतील पोटनिवडणूक (Andheri by-Election) बिनविरोध करणे योग्य होईल आणि महाराष्ट्रात यातून योग्य संदेश जाईल.
निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता योग्य संदेश जाणे महत्वाचे आहे.
त्यामुळे ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन मी सर्वांना करतो.

 

राज ठाकरे यांनी भाजपाला दिलेल्या पत्राबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांची त्यांच्या पक्षाची भूमिका घेतली.
मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून भूमिका जाहीर केली आहे.
त्यांनी पत्रात काय म्हटले आहे याची कल्पना मला नाही. मी ते पत्र वाचलेले नाही.

 

Web Title :- Andheri by-Election | after raj thackeray now sharad pawar also demand for without opposition andheri by election