Loksabha 2019 : आंध्र प्रदेशात TDP-YSR काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, दोन जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

आंध्र प्रदेशात पुथलपट्टू मतदार संघातील बंदारलापल्ली येथील बूथ वर TDP-YSR यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे झाल्याची माहिती मिळते आहे. हा वाद इतका टोकाला गेला की यावेळी वाद सोडवताना पोलिसांना लाठीचा वापर देखील करावा लागला. एवढेच नाही तर एका वृत्तसमूहाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे वृत्तएएन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

या घटनेत स्थानिक नेता सिद्ध भास्कर रेड्डी ची हत्या करण्यात आली आहे. या स्थानिक नेत्याची हत्या वायएसआरसीपी च्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या झटापटीत झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अनंतपुर जिल्ह्यातील तडिपात्री विधानसभा क्षेत्रात घडली आहे. दोन्हीचा पक्षातील झालेल्या झटापटीनंतर रेड्डी गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा या घटनेत मृत्यू झाला.