Angrezi Medium Trailer : इरफाननं शेअर केला व्हिडीओ, एकदम ‘इमोशनल’ करून टाकणार 1 मिनीट 19 सेकंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रर इरफान खानच्या अंग्रेजी मीडियम या सिनेमाचा ट्रेलर 13 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. त्याआधीच इरफान खाननं एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि वरुण धवन यांसारखे कलाकारही हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आपल्या आजारपणामुळे इरफान खान सिनेमाचं प्रोमशन करू शकत नाही त्यामुळे तुम्ही हा सिनेमा पहावा असं अपीलही ते करत आहेत.

अंग्रेजी मीडियमच्या शुटींगदरम्यानचे काही फोटो असलेल्या या व्हिडीओला इरफान खानचा व्हाईस ओव्हर आहे. आपल्या या इमोशनल व्हिडीओत इरफान खान म्हणत आहे की, “हॅलो बहिणींनो आणि भावांनो. नमस्कार. मी इरफान खान. मी आज तुमच्यासोबत आहेपण आणि नाहीपण. हा अंग्रेजी मीडियम सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे.”

पुढे इरफान खान म्हणतो, “जेवढ्या प्रेमानं आम्ही हा सिनेमा बनवला आहे तेवढ्याच प्रेमानं हा सिनेमा प्रमोट करण्याची माझी इच्छा होती. परंतु माझ्या शरीरात काही नको असलेले पाहुणे आहेत त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे. काहीही असलं तरी तुम्हाला कळवलं जाईल. ते म्हणतात ना, When life gives you lemons, you make a lemonade. बोलायला चांगलं वाटतं. परंतु जेव्हा खरंच आयुष्य तुम्हाला लिंबू देतं तेव्हा खरंच सरबत बनवणं किती अवघड असतं ते समजतं.”

शेवटी इरफान खान म्हणतो, “हा सिनेमा तुम्हाला हसवेल रडवेल. ट्रेलर एन्जॉय करा. एकमेकांप्रति दयाळू रहा. सिनेमा बघा….. आणि हो माझी वाट पहा.”