संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली काळी शाई, कांदे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे तालुक्यातील नेर येथून केला. महायुतीचे उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मुख्यमंत्री धुळे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी साक्रीत मुंख्यमंत्री यांच्या गाडीच्या ताफ्यावर संतप्त शेतकऱ्यांनी काळी शाई आणि कांदे फेकले. या प्रकरामुळे या ठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण होते.

जिल्ह्यात आज बुधवारी आघाडीचे उमेदवार यांचे प्रचारार्थ मुंख्यमंञी धुळे दौऱ्यावर आले. सकाळी शिरपुर येथे सभेत कॉग्रेसचे माजी मंत्री अमरीश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिरपुर येथील महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा यांचे प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी नेर येथे महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांचे प्रचारार्थ जाहिर सभा पार पडली.

मुख्यमंत्री यांचा गाडीचा ताफा साक्री येथील सभेकडे रवाना झाला. ताफा साक्रीत सभेच्या ठिकाणी जात असताना संतप्त शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या ताफ्यावर काळीशाई व कांदे फेकले. यावेळी पोलीसांनी एकाला व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. अन्य फरार झाले आहे. यानंतर गाडीचा ताफा सभेच्या ठिकाणाकडे रवाना झाला.

याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव धिरज देसले असून तो कासारा येथील राहणार आहे, अशी माहिती साक्री पोलिसांनी दिली आहे. तर त्याच्या इतर साथिदारांचा शोध सुरु आहे.

Visit : Policenama.com