Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना (Anil Deshmukh Case) सीबीआयने (cbi) क्लिन चिट दिल्याबद्दलचा फेरफार केल्याचा अहवाल खुद्द अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांनीच लीक केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. सीबीआयने याप्रकरणी आपल्याच एका उपनिरीक्षक आणि अनिल देशमुख यांचा वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. त्या एफआयआरमध्ये सीबीआयने हा दावा केला आहे.

सीबीआयच्या गोपनीय अहवालात बदल करुन तो फोडण्यासाठी सीबीआयचे पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. अभिषेक तिवारी हा ६ एप्रिल आणि २८ जून अशा दोन दिवशी तपासासाठी पुण्याला आला होता. त्यापैकी दुसर्‍या भेटीच्या वेळी २८जून रोजी अ‍ॅड. डागा याने त्याला आयफोन १२ प्रो हा एक लाखांहून अधिक किंमत असलेला मोबाईल भेट दिला होता. या फोनचा वापर करुन तिवारी याने अनेक संवेदनशील कागदपत्रे व माहिती आनंद डागा यांना पुरविल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले आहे. अभिषेक तिवारीकडून हा आयफोन जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. अभिषेक तिवारी हा नियमितपणे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकीलाकडून लाच घेत होता.

अनिल देशमुख यांनीच हा बनावट अहवाल लीक केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्या केससंदर्भात सीबीआयचा अंतर्गत चौकशी अहवाल फुटला होता. चौकशी अहवालात छेडछाड आणि लीक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

हे देखील वाचा

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे  अधीक्षक यु. टी. पवार यांची ‘उचलबांगडी’

Dr. Narendra Dabholkar | 5 आरोपींवर मंगळवारी होणार आरोप निश्चिती ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात, सुनावणीतील महत्त्वाचा टप्पा

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh Case CBI includ in FIR what happens in pune News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update