अंक ज्योतिष : 21 फेब्रुवारी 2020 ला तुमच्यासाठी कुठला नंबर असेल ‘शुभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
आज कुटुंबात वादविवाद होऊ शकतो. काळजी घ्या. तुमच्या कार्यात तुम्ही निपुण आहात. अडचणी येतील पण घाबरू नका. बेजबाबदारपणे वागू नका. अप्रिय घटनांच्या बाबतीत सावध रहा.
शुभ अंक – 3
शुभ रंग – व्हायलेट

अंक – 2
स्कूल, कॉलेजचे जूने मित्र भेटतील. प्रिय व्यतीसोबत प्रवास करण्याचा योग आहे. कुटुंबाला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. ताप किंवा इन्फेक्शनमुळे आरोग्य बिघडू शकते. दवाखान्यात जावे लागू शकते.
शुभ अंक-4
शुभ रंग- हिरवा

अंक – 3
जमीन, संपत्तीची प्रकरणे मार्गी लागतील. आर्थिक अडचणी कमी होतील. वाढदिवसाची पार्टी इत्यादी सोहळ्यात भाग घ्याल. अभ्यासात रूची वाढेल. काम निष्ठेने आणि इमानदारीने करा. यामुळे प्रगती होईल. मुलावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
शुभ अंक- 15
शुभ रंग – मस्टर्ड

अंक – 4
कामकाज आणि व्यापार वाढविण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल, इच्छेप्रमाणे यश मिळणार नाही. संगीतात रूची तुम्हाला यश मिळवून देईल. लॉटरी, जुगार, दारू यापासून दूर रहा.
शुभ अंक – 11
शुभ रंग – स्लेटी

अंक – 5
आजचा दिवस शुभ आहे. घरासाठी खरेदी करू शकता. जोडीदाराबाबत सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रयत्न कराल. त्यांच्या सोबत कार्यक्रम करू शकता. बुद्धी व विवेकाचा वापर करा. दुसर्‍यांच्या सल्ल्याने काम करू नका. यामुळे नुकसान होऊ शकते. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात.
शुभ अंक – 16
शुभ रंग – सफेद

अंक – 6
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे, तो नको त्या गोष्टीत वाया घालवू नका. विवाहासाठी स्थळ येऊ शकते. कोणत्याही टीकेपासून दूर रहा. संततीच्या बाबतीत एखादी सुखदवार्ता समजू शकते.
शुभ अंक – 14
शुभ रंग – गुलाबी

अंक – 7
व्यापारात कायद्याची समस्या येऊ शकते. परंतु, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत सांस्कृतिक उत्सव किंवा फिल्म पाहण्यासाठी जाऊ शकता. कुणाशीही तुमचे गुपित शेयर करू नका. कोणताही निर्णय सावधगिरीने घ्या.
शुभ अंक – 44
शुभ रंग – लाल

अंक – 8
मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. घरी जास्त वेळ खर्च होईल. प्रिय व्यक्तीसाठी बुके घेऊन जाऊ शकता. नात्यांमध्ये ताजेपणा येऊ शकतो. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. रोमँटिक डेटवर जाऊ शकता. दिवस मजेत जाईल.
शुभ अंक -12
शुभ रंग – क्रीम

अंक – 9
आज शुत्रूंपासून सावध रहा. कायदेशीर आणि न्यायालयीन प्रकरणात यश नक्की मिळेल. मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. प्रवास करू शकता. वायफळ खर्च करू नका. वाहन चालवताना सावध रहा.
शुभ अंक – 2
शुभ रंग – पिवळा