अंक ज्योतिष : 15 फेब्रुवारीचा लकी नंबर आणि शुभ रंग

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक- 1
आजचा दिवस व्यापारात लाभदायक आहे. आर्थिक साधने सहज उपलब्ध होतील. अडलेल्या कामांना गती द्याल. प्रेमसंबंध उघड झाल्याने बदनामी होऊ शकते. कोणतेही जोखमीचे काम करू नका. तुमची योग्यता वाढेल.
शुभ अंक- 2
शुभ रंग- व्हायलेट
नाव अक्षर- D M T

अंक- 2
व्यापारात योग्य निर्णय घ्याल, ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आपल्या जीवनशैलीत बदल कराल, आणि थांबलेली कामे पूर्ण कराल. संततीकडून खुशखबर मिळेल. घरात पाहुण्याचे आगमन होऊ शकते. प्रवास कराल, परंतु खर्च जास्त होईल. जोडीदाराशी असलेला तणाव संपुष्टात येऊ शकतो.
शुभ अंक- 5
शुभ रंग- निळा
नाव अक्षर- C G L S

अंक- 3
कामाच्या धावपळीत आरोग्य बिघडू शकते. ब्लड प्रेशर व मधुमेहसारखे आजार त्रास देऊ शकतात. व्यापार्‍यांना एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. आजचा प्रवास लाभदायक ठरू शकतो. बहिण-भावाच्या प्रेमात वाढ होईल. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल.
शुभ अंक- 12
शुभ रंग- सोनेरी
नाव अक्षर- F P

अंक- 4
काही वाईट लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील, सावध रहा फसू नका. तुम्ही तुमच्या गुप्त शत्रुंवर विजय प्राप्त करू शकता. मन प्रसन्न राहिल. मुलांसोबत फिरण्याचा कार्यक्रम करू शकता. व्यापारात अनेक महत्वपूर्ण कामे होतील. ज्यामुळे धाडसी व्यक्ती म्हणून तुमची प्रतिष्ठा वाढेल.
शुभ अंक- 6
शुभ रंग- लेमन

अंक- 5
मोठ्या कालावधीपासून सुरू असलेली व्यापारी समस्या सुधारू शकते. मुले आणि कुटुंबातील लोकांवर रागावण्यापेक्षा विवेकाने वागा. आज तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून सुद्धा मदत मिळू शकते. जोडीदाराकडून जास्त आशा करू नका.
शुभ अंक- 9
शुभ रंग- सफेद
नाव अक्षर- A I J Q Y

अंक- 6
आज एखादे काम असे कराल, ज्यामुळे सर्वजण तुमची प्रशंसा करतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. लोक तुमच्या सरळ स्वभावाचा चुकीचा फायदा घेतील, सावध रहा. मित्रांच्या मदतीने बिघडलेले काम व्यवस्थित होईल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पिवळा
नाव अक्षर – R Y U I

अंक- 7
व्यापारात लाभ होईल. लक्ष्य पूर्ण करण्याचा दबाव राहिल्याने कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. सासरच्यांमधील नात्यातील गोडवा कमी होईल. वडीलांशी चांगले जमेल. पत्नीचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक- 2
शुभ रंग- सिल्व्हर
नाव अक्षर- U V W

अंक- 8
आर्थिक अडचणी दूर होतील. कुटुंबाला पिकनिकसाठी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला कुणीतरी धोका देऊ शकते. सावध राहून काम करा. राजकीय लोकांची भेट होईल. कौटुंबाची मनोकामना पूर्ण कराल.
शुभ अंक- 12
शुभ रंग- लेमन
नाव अक्षर- B K R
अंक- 9
एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी पुढे याल. योग्यता आणि क्षमतेच्या बळावर पुढे जाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ फळ देणारा आहे. एखादा खोटा आळ तुमच्यावर येऊ शकतो. वाहन जपून चालवा, बपर्वाईचे परिणाम घातक होऊ शकतात.
शुभ अंक- 10
शुभ रंग- लेमन
नाव अक्षर- E H N X

You might also like