सुरूवातीला ‘प्रायोगिक’ तत्वावर 50 ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने सत्तेत येण्याआधी आपल्या वचननाम्यात शब्द दिला होता की राज्यातील गोरगरिबांना फक्त 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करुन देण्यात येईल. यानंतर राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयांच्या शिवभोजनाची घोषणा केली. यासंबंधित माहिती काल हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली. त्यानंतर आज ट्विट करत ही घोषणा करण्यात आली.

ट्विटमध्ये लिहिले की महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला 10 रुपयांमध्ये सकस आणि परवडणारे ‘शिवभोजन’ देण्याची महाराष्ट्र विकास आघाडीची महत्वाची घोषणा आहे ! सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी ‘शिवभोजन’ केंद्रे सुरु करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात होणार आहे.

तसेच मी विदर्भाचा नातू म्हणत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प सुरु करण्याची घोषणा केली. यासंबंधित माहिती त्यांनी कालच्या अधिवेशनात देखील दिली. यानंतर आज ट्विट करत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.

यात सांगण्यात आले की पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प सुरु करण्याची महाराष्ट्र विकास आघाडी घोषणा करत आहे ! भूगर्भात दडलेल्या खनिज संपत्तीचा संपत्ती म्हणून उपयोग करुन हे सरकार जमशेदपूर भिलाई सारखा एक मोठा स्टील प्लांट पूर्व विदर्भात सुरू करण्याचे प्रयत्न पूर्ण करुन दाखवणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/