‘NDA’तील आणखी एका पक्षाची ‘NRC’वर ‘नाराजी’ !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्षात खदखद पहायला मिळत असून त्यातील काही जणांनी तर थेट केंद्राला या कायद्यावरुन विरोध दर्शविला आहे. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर सर्वात जुना पक्ष असलेला शिरोमणी अकाली दलाने या कायद्यातील दुरुस्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

जेडीयु आणि लोजपा यांच्यानंतर आता शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी यामध्ये मुसलमानांही सहभागी करुन घ्यावे अशी मागणी केली आहे. आम्ही एनआरसी च्या बाजूने नाही. सुखबीर सिंह बादल यांनी संसदेत ही बाब स्पष्ट करुन केंद्रीय गृहमंत्री शहा यांना यात मुसलमानांचा समावेश करावा अशी सूचना केली होती.

नरेश गुजराल यांनी सांगितले की, एनडीएच्या बैठकीत नागरिकत्व सुधारणा कायदा यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा होत नाही. त्यामुळेच कदाचित एनडीएमधील घटक पक्ष या मुद्द्यांवर दुखी आहेत. आम्हाला वाजपेयी यांच्या वेळेची आठवण येते. वाजपेयी यांनी २० पक्षांना एका धाग्यात गुंफुन ठेवले होते.

त्यांच्यावेळी सर्व पक्ष खुश होते. सर्व पक्षांचा सन्मान ठेवला जात होता. त्यांच्याकडून अरुण जेटली यांनी ती बाब पुढे सुरु ठेवली होती. अरुण जेटली होते, तोपर्यंत भाजपा वरिष्ठ नेत्यांपर्यंत घटक पक्षांचे म्हणणे कानावर घालण्यासाठी जेटली हे एक माध्यम उपलब्ध तरी होते. त्यांच्या निधनानंतर एनडीए काही काम करीत नाही.

गुजराल यांच्या या वक्तव्याअगोदर शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी आमचे गुरु आणि आमचा धर्म सर्वांच्या कल्याणाची शिकवण देतो. यामुळे यामध्ये मुसलमानांचाही समावेश केला पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/