Anti Corruption Bureau Nashik | जामीन मिळवून देण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि Police शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – संशयित आरोपीला जामीन (Bail) मिळवून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि पोलीस शिपायाला (constable) नाशिक लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Nashik) सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Nashik) ही कारवाई बुधवारी (दि.24) अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) अवारात केली.

पोलीस उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे (PSI Kailas Ananda Sonawane) आणि पोलीस शिपाई दिपक बाळकृष्ण वाणी (Deepak Balkrishna Vani) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Nashik) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात 353,143 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात तक्रारदार यांना नाशिक न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर (bail granted) केला आहे.
मात्र पोलीस ठाण्यात जामीन प्रक्रिया (Bail Procedure) पूर्ण करुन देण्यासाठी सोनवणे आणि वाणी यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाच मागितली होती.
तडजोडीत 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी एसीबीकडे मंगळवारी (दि.23) तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी करुन सापळा रचला.

तक्रारदार यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे व पोलीस शिपाई दिपक वाणी यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात लाचेची रक्कम स्विकारली. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्विकारल्यानंतर पथकाने दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला.
या प्रकरणात आज (बुधवार) दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Nashik | anti corruption bureau nashik arrest police sub inspector kaillas ananda sonawane and policeman deepak balkrishna vani while taking bribe of ten thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nagar Panchayat Election | राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू

SBI ग्राहकांसाठी भेट ! केवळ 4 क्लिक करून घरबसल्या मिळवा पर्सनल लोन, प्रोसेसिंग फी शून्य

ST Workers Strike | आज रात्रभर ‘विचारमंथन’, उद्या सकाळी संपकऱ्यांची भूमिका स्पष्ट करणार

Shraddha Arya | लग्नानंतर टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा आर्याने शेअर केली पहिली पोस्ट

Pune Crime | 37 लाखांच्या फसवणूक प्रकरणी श्री ट्रेडर्सच्या प्रदिप म्हात्रे आणि व्हीजन आयटी सोल्युशनच्या जयेश म्हात्रेविरूध्द गुन्हा

Maharashtra Cabinet Reshuffle | अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसचे दोन मंत्री बदलणार तर, ‘या’ चेहर्‍यांना संधी