×
HomeशहरठाणेAnti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्‍या हवालदारावर गुन्हा...

Anti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्‍या हवालदारावर गुन्हा दाखल

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात जामीनासाठी मदत करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे हवालदाराविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा (Anti Corruption Bureau Thane) दाखल केला आहे.

 

रवींद्र सपकाळे (वय ४९) असे या पोलीस हवालदाराचे (Police Havaldar Ravindra Sapkale) नाव आहे. उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये (Vittalwadi Police Station) तक्रारदार यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत (domestic violence act) एक गुन्हा दाखल (Thane Police) आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच न्यायालयात जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्या बाजूने म्हणणे सादर करण्यासाठी हवालदार रवींद्र सपकाळे याने २ हजार रुपयांची लाच मागितली होती.

 

तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी १२ जुलै रोजी करण्यात आली. त्यात हवालदार सपकाळे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आता सपकाळे विरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | Filed a case against a police havaldar ravindra sapkale who demanded a bribe to help in a crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News