Anti Corruption Bureau Thane | 25000 हजाराची लाच घेताना महापालिकेचा सहायक आयुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध बांधकाम (Illegal Construction) सुरु ठेवण्यासाठी महापालिकेतील (Municipal Corporation) प्रभाग समिती क्रं.2 चे सहायक आयुक्त (Assistant Commissioner) अनिल खतुरानी (Anil Khaturani) याला 25 हजार रुपयाची लाच घेताना (Accepting Bribe)  ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) ही कारवाई आज (सोमवार) प्रभाग कार्य़ालयात सापळा रचून केली. गेल्याच आठवड्यात महापालिकेचे प्रभारी वाहन व्यवस्थापकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती.

 

महापालिका प्रभाग समिती क्रमांक 3 चे प्रभारी सहाय्यक आयुक्त अनिल खतूरानी यांनी प्रभाग क्षेत्रात अवैध बांधकामे सुरु ठेवण्यासाठी 50 हजाराची लाचेची मागणी करुन यापूर्वी 25 हजार रुपये स्विकारल्याचे मान्य केले. तसेच उर्वरित 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. अखेर तक्रारदार यांनी 1 डिसेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Thane) तक्रार केली. पथकाने 2 डिसेंबर रोजी पडताळणी केली.

 

पडताळणीमध्ये सहायक आयुक्त अनिल खतूरानी यांनी त्यांचे प्रभागामध्ये चालू असलेल्या इतर बांधकाम सुरु ठेवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी (Demanding Bribe) केली. यापूर्वी 25 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित 25 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.27) दुपारी अडीचच्या सुमारास प्रभाग समिती कार्यालयात सापळा रचला. सहायक आयुक्त अनिल खतूरानी याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. खतूरानी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | municipal corporation assistant commissioner anil khaturani arrested taking bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1426 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

ना मिनिमम बॅलन्सचे झंझट, ना लागणार चार्ज ! जाणून घ्या कसे उघडायचे Jio Payments Bank Account आणि काय आहेत याचे फायदे?

Property Tax Pune | पाच वर्षात पाणीपट्टी 100 टक्क्यांनी वाढली; परंतू पुणेकरांना अद्याप ‘चोवीस तास’ पाणी पुरवठा नाही; मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव

Pune Corporation | पुणे मनपाने मागीलवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा यंदा डिसेंबरमध्येच गाठला ! मार्चअखेर पर्यंत 6500 कोटींचा टप्पा पार होईल – हेमंत रासने

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज