Anti Corruption Trap | 40 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह 2 जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

निपाणी/सदलगा : वृत्तसंस्था Anti Corruption Trap | पानमसाला कारखानदाराकडून 40 हजार रुपयाची लाच (Bribe) घेताना सदलगा पोलीस ठाण्यातील (Sadalga Police Station) पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबलवर (police constable) बेळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Belgaon Anti Corruption) कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांनी 10 दिवसांपूर्वी सदलगा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला आहे. या दरम्यान बोरगाव येथील राजू पाच्छापुरे यांच्या पानमसाला कारखान्याची पाहणी करुन व्यवसाय बंद करण्यास सांगितले. तसेच कारखाना सुरू ठेवण्यासाठी 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. पाच्छापुरे यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार बेळगाव जिल्हा लाचलुचपत विभागाने सापळा रचून Anti Corruption Trap पोलीस उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी,
कॉन्स्टेबल मायाप्पा गड्डे, श्रीशैल मंगी यांना तक्रारदार यांच्याकडून 40 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
या घटनेमुळे सदलगा, चिकोडी आणि निपाणी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
ही कारवाई बेळगाव जिल्हा लाचलुचपत पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Title : Sub Inspector of Sadalga Police Station possession by ACB

 

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

BMC | कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा?, पालिका घेणार लवकरच निर्णय

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांची पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट