अनिल देशमुख यांच्यावर भाजपाचा सवाल; कुणासाठी सुरू होती वसूली, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अँटीलिया केसमध्ये परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी विचारले की, सचिन वाझे यांना कुणाच्या दबावात आणले गेले. शिवसेनेच्या, मुख्यमंत्र्यांच्या की शरद पवार यांच्या?

पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, हे भ्रष्टचाराचे प्रकरण नाही. हे ऑपरेशन लूटमार आहे. त्यांनी म्हटले की, खंडणी हा एक गुन्हा आहे आणि जर या प्रकरणात शरद पवार यांना ब्रीफ केले जात असेल तर प्रश्न निर्माण होतो की, शरद पवार जर सरकारमध्ये नाहीत तर त्यांना कोणत्या कारणासाठी ब्रीफ केले जात आहे. आणखी एक प्रश्न हा सुद्धा आहे की, शरद पवार यांनी आपल्या स्तरावर काय कारवाई केली? हा गुन्हा रोखण्यासाठी आणि तपासासाठी काय केले?

शरद पवार यांचे मौन प्रश्न निर्माण करते
त्यांनी म्हटले की, शरद पवार यांचे मौन अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांची शांतता आणि सभागृहाच्या आत आणि बाहेर सचिन वाझे यांना डिफेंड करणे. सचिनचे पद एएसआय आहे. ज्यास क्राइम सीआयडीचा चार्ज दिला गेला आहे. हे सुद्धा एक आश्चर्य आहे. प्रसाद यांनी पुढे म्हटले की, एकीकडे सीएम डिफेंड करत आहे आणि दुसरीकडे होम मिनिस्टर म्हणतो की, मला 100 कोटी आणून द्या. हे खुप गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणाची गंभीर आणि प्रमाणिकपणे चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, कारण यामध्ये शरद पवार यांची भूमिका येईल आणि मुंबई पोलीसांची भूमिका सुद्धा येईल. मुख्यमंत्री आणि होम मिनिस्ट्रीला अनेक प्रश्न केले जाऊ शकतात.

सचिन वाझेकडून आणखी किती वाईट कामं करू घेतली
प्रसाद यांनी म्हटले की, प्रश्न हा सुद्धा उपस्थित होतो की, सचिन वाझेकडून महाराष्ट्र सरकारने आणखी किती वाईट कामं करून घेतली. ही गोष्ट मी यासाठी बोलत आहे कारण एका इन्स्पेक्टरला सीएम डिफेंड करत आहे हे मी देशात कुठेही पाहिले नाही. अखेर सचिन वाझेला वाचवण्याची इतकी अगतिकता का होती. सचिन वाझेच्या पोटात अशी कोण-कोणती रहस्य लपलेली आहेत. हे जाणून घेतले पाहिजे. एक इन्स्पेक्टर अनेक वर्ष सस्पेंड राहिल्यानंतर शिवसेनेत आणला जातो. त्याच्याकडून अनेक कामे करून घेतली गेली. आम्हाला शंका आहे की, संपूर्ण महाराष्ट्र सरकार वाझेला वाचवत आहे. कारण त्याच्याकडे बरीच रहस्य लपलेली आहेत.

गृहमंत्री पक्षासाठी वसूली करत होते की संपूर्ण सरकारसाठी
रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, एक गंभीर प्रश्न हा सुद्धा आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. 100 कोटी रुपये कलेक्ट करायला सांगितल्याचा आरोप आहे, अशावेळी प्रश्न हा आहे की देशमुख स्वतासाठी करत होते की, एनसीपीसाठी की उद्धव सरकारसाठी हे करत होते?