
Anupriya Patel Husbands Car Accident | केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या पतीच्या कारला अपघात
प्रयागराज : Anupriya Patel Husbands Car Accident | केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांचे पती आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आशिष पटेल यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या हात-पायाला दुखापत झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. लग्नाचा वाढदिवस असल्याने ते घरी निघाले होते. (Anupriya Patel Husbands Car Accident)
युपीचे कॅबिनेट मंत्री आशिष पटेल यांच्या वाहनांचा ताफा प्रयागराजहून मिर्झापूरला निघाला असताना वाटेत एक दुचाकीस्वार मध्ये आल्याने त्याला वाचवताना ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली. (Anupriya Patel Husbands Car Accident)
अपघातात जखमी झालेल्या आशिष पटेल यांना मेजा रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपाचर करून घरी सोडण्यात आले आहे. अपघातात पटेल यांच्या कारचे नुकसान झाले आहे. आशिष हे एमएलसी असून योगी सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री आहेत.
‘अपना दल’चे संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या अनुप्रिया पटेल कन्या आहेत.
२०१७ मध्ये आईशी मतभेद झाल्याने त्यांनी अपना दलातून बाहेर पडत अपना दल (सोनेलाल) पक्ष स्थापन केला. अनुप्रिया पटेल अपना दल या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर आशिष पटेल हे अपना दलाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आज अनुप्रिया आणि आशिष पटेल यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने आशिष पटेल हे मिर्झापूरला निघाले होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ring Road | पुणे : रिंगरोडसाठी 14 गावांतील भूसंपादन पूर्ण
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ