RTO च्या वाहन चालक आणि लिपिकाकडून रिक्षा चालकास बेदम मारहाण

कोल्हापूर (कुरुंदवाड) : पोलीसनामा ऑनलाइन – कुरुंदवाड येथील गिरीश टॉकीजजवळ अ‍ॅपे रिक्षा चालकाचा सिनेस्टाईलने पाठलाग करून मोटार वाहन निरीक्षकाच्या (RTO) वाहन चालकाने आणि लिपिकाने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तब्बल तासभर सुरु असलेला हा प्रकार पाहून नागरिकांनी मारहाणीचे कारण विचारले. मात्र, चालक आणि लिपिकाने तेथून काढता पाय घेतला.

निरीक्षक अ‍ॅपे रिक्षा चालकाला बसस्थानक परिसरात घेऊन गेले. अ‍ॅपे रिक्षा जप्त करून बस स्थानकात जमा केली. या घटनेनंतर बस स्थानक परिसरात शहरातील अ‍ॅपे रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केली. लिपिक आणि चालकाच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून या घटनेच्या निषेधार्थ रिक्षा संघटनेतर्फे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जावेद गलगले हा अ‍ॅपे रिक्षा मधून आला. हेरवाडहून कुरुंदवाड येथे सुरु असलेल्या स्पर्धेच्या खेळाडूंना सोडण्यासाठी जात असताना गिरीश टॉकीज परिसरात आरटीओ निरीक्षकाच्या वाहनाने त्याचा पाठलाग केला. जावेदच्या रिक्षाला गाडी आडवी लावून रिक्षा थांबवली. रिक्षा चालक जावेद याला रिक्षातून बाहेर ओढत तू आम्हाला पाहून पळून जातोस काय असे म्हणत त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. लिपिक आणि चालकाने रिक्षा चालकाना केलेल्या मारहाणीचा रिक्षा चालक संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like