My Talking Tom Friends गेम Android आणि iOS वर उपलब्ध ! जाणून घ्या डिटेल्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लहान मुलांची फेवरेट आणि लोकप्रिय गेम My Talking Tom चं नवीन व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. My Talking Tom Friends नावानं लाँच करण्यात आलेली ही गेम आता युजर्स आयओएस आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर खेळू शकतात. Outfit 7 Limited द्वारा तयार करण्यात आलेली My Talking Tom Friends ही एक व्हर्चुअल पेट गेम आहे. Outfit 7 Limited च्या एकूण 23 गेम्स आहेत. यात My Talking Tom, My Talking Angela, My Talking Hank आणि My Talking Tom Friends यांचा समावेश आहे. खास बात अशी की, या नवीन व्हर्जनमध्ये तुम्हाला 6 पात्र एकत्र मिळणार आहेत.

My Talking Tom Friends ही गेम आता गुगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवरून मोफत डाऊनलोड केली जाऊ शकते. 13 मिलियन लोकांनी यासाटी प्रीरजिस्ट्रेशन केलं होतं. केवळ लहानच नाहीत तर मोठी माणसेही खेळू शकतात. एवढी ही गेम रोचक आहे. या गेममध्ये Tom, Angela, Hank, Ben, Ginger आणि Becca असे 6 एकत्र मिळणार आहेत. यात तुम्ही भरपूर अॅक्शनचा आनंद घेऊ शकता यात मात्र शंकाच नाही.

यात अनेक मजेदार गोष्टी करू शकतात. जसे हे पात्र शॉपिंग करतात, पैसे कमावतात आणि इतरही बरंच काही करतात. या गेमची साईज 85 MB आहे. अद्याप 50 लाखांहून अधिक लोकांनी ही गेम डाऊनलोड केली आहे.