‘त्या’ Dysp आणि ‘आमदारा’मध्ये खडाजंगी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आत थांबण्याच्या कारणावरून कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सरपंच आणि इतरांना पकडून गाडीत बसविण्याच्या कारणावरून गोंधळ उडाला. यावेळी संबंधितांना अटक करण्याचा जाब विचारणारे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सरपंच रणजित कांबळे, अमोल माळी, अजित शेटे, मंजुनाथ वराळे, प्रकाश शिनगारे आदींना कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेती व्यवसाय विद्या मंदिर मतदान केंद्राच्या आवारात सकाळी नऊच्या सुमारास १०० मीटर अंतराच्या आत थांबण्याच्या कारणावरून पकडून गाडीत बसविले. त्या कारणावरून गोँधळ उडाला.

दरम्यान आमदार हसन मुश्रीफ तेथे आले. त्यांनी संपुर्ण घटनेची माहिती घेऊन पोलीस उपअधिक्षक अमृतकर यांना संबंधित लोकांना पकडल्याचा जाब विचारला. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी दिलीप देसाई यांच्याशी फोन करून या प्रकरणासंदर्भात संवाद साधला.

पोलीस दडपशाही पद्धतीने भाजपचे काम करत आहेत. असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी गोकुळ दुध संघ आणि अनेक निवडणुकांवेळी अशी कृत्ये करत आले आहेत. संबंधितांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांनी संपुर्ण बुथ ताब्यात घेतलेला नाही. किंवा पैसे वाटले नाहीत. त्यामुळे पोलीस जाणीवपुर्वक अशी कृत्ये करत आहेत. अशा घटनांमुळे शांततेत चाललेल्या मतदानाला गालबोट लागेल आणि दंगा होईल अशी हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

Loading...
You might also like