शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून ‘या’ बड्या नेत्याचा पत्ता कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीकरिता प्रत्येक पक्षाच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडून देखील स्टार प्रचारकांची यादीच जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीत आमदार अर्जुन खोतकर यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.

लोकसभेसाठी जालना मतदार संघातून तिकीट देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात चांगलीच जुंपली होती. एवढेच नाही तर जालना मतदार संघातून भाजप शिवसेना महायुतीकडून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर खोतकर यांनी बंडाची भूमिका घेतली होती. तसेच लोकसभा लढवण्याचा हट्ट धरला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी युतीधर्म पाळणार असल्याचे सांगितले. मात्र आता खोतकर यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना स्टार प्रचारकांची यादी

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री अनंत गिते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जल संधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, आमदार निलम गोऱ्हे, विनोद घोसाळकर, आदेश बांदेकर यांचा समावेश आहे.

Loading...
You might also like