खळबळजक ! नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात एक जण ठार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकमधील उंटवाड़ी परिसरात सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांवर गोळीबार केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. एका कर्मचाऱ्याने साय़रन वाजवल्याने दरोडेखोरांनी चिडून गोळीबार केला आणि त्यानंतर त्यांनी पोबारा केला. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर या घटनेने नाशिकमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

संजू सॅम्युअम गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन हे अशी जखमींची नावे आहेत.

असा टाकला दरोडा
उंटवाडीतील मुथुट फायनान्सच्या कार्यालयात रोजच्या प्रमाणे कामकाज सुरु असताना सकाळी अकराच्या सुमारास चार दरोडेखोर शिरले. या दरोडेखोरांनी आत घूसून आतील चार ते पाच ग्राहकांना बाजूला एका कोपऱ्यात नेले. शाखेतील कर्मचारी नेहमीप्रमाणे कामात होते. अचानक दरोडेखोरांनी पिस्तूल आणि रिव्हॉल्वर काढून आरडाओरडा केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काय करावे सुचले नाही.

मात्रबाहेर असलेल्या एका कर्मचाऱ्याने सायरन वाजवले आणि त्याचाच दरोडेखोरांना राग आला. दरोडेखोरांनी सायरन वाजताच कुणी सायरन वाजवला याची विचारणा करत त्यांनी कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. सायरन वाजल्याने दरोडेखोरांचा हेतू सफल झाला नाही. त्यामुळे त्यांनी पोबारा केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात एक कर्मचारी ठार झाला तर इतर तीन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांची धावपळ
या घटनेने संपुर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली आहे.

चार दरोडेखोरांनी हल्ला केला असून त्यांनी केलेल्या गोळीबारात एक कर्मचारी ठार झाला. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तर इतर परिसरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरु आहे. युध्दपातळीवर त्यांचा शोध सुरु आहे असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?