LAC वर परिस्थिती नाजूक, प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार, लडाख दौर्‍यानंतर लष्कर प्रमुखांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावादरम्यान लडाखच्या दोन दिवसीय दौर्‍यावर गेलेले लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे एलएसीवर स्थिती गंभीर आणि नाजूक आहे. एलएसीच्या सध्यस्थितीवर लष्करप्रमुख म्हणाले, एलएसीवर स्थिती थोडी तणावपूर्ण आहे. स्थिती लक्षात घेता, आपण आपल्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतली आहे, जेणेकरून आपली सुरक्षा आणि अखंडता सुरक्षित राहावी. आपण कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत.

लष्करप्रमुख म्हणाले, मागील 2-3 महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे, परंतु आम्ही चीनसोबत सैन्य आणि राजकीय दोन्ही स्तरावर चर्चा करत आहोत. हे होत आहे आणि भविष्यात सुरू राहिल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, चर्चेतून आपसातील मतभेदावर तोडगा निघेल. आपण आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी सक्षम असू.

लष्करप्रमुख म्हणाले, जवानांचे मनोधैर्य मोठे आहे आणि ते कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहेत. मी पुन्हा सांगतो की, आमचे अधिकारी आणि जवान जगात सर्वात चांगले आहेत आणि ते केवळ लष्कर नव्हे, तर देशाला गौरवित करतील.

नरवणे म्हणाले, मी लेहमध्ये पोहचल्यानंतर विविध ठिकाणांचा दौरा केला. मी अधिकारी, जेसीओ यांच्याशी चर्चा केली आणि तयारीचा आढावा घेतला. जवानांचे मनोबल मोठे आहे आणि सर्व आव्हानांना तोंड देण्यास तयार आहेत.

नरवणे यांनी गुरूवारी लडाखमध्ये दोन दिवसीय दौरा सुरू केला. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, पँगोंग सरोवराच्या दक्षिण किनार्‍याजवळ स्थिती बदलण्याच्या चीनच्या ताज्या प्रयत्नामुळे क्षेत्रात सुरक्षा स्थितीचा व्यापक आढावा घेण्याच्या दृष्टीने लष्करप्रमुखांनी हा दौरा केला. तत्पूर्वी मुख्य संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी म्हटले की, भारताचे सैन्यबळ चीनची आक्रमक हालचालींना सर्वात चांगल्या आणि योग्यप्रकारे तोंड देण्यास सक्षम आहे.