सलमान खानला मिळालं सर्वात मोठं ‘बर्थडे’ गिफ्ट, बनला ‘मामु’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुपरस्टार सलमान खान आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. काल रात्री सलमान खानने आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह वाढदिवसाची पार्टी केली होती. सलमानवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याच्या वाढदिवसाबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला होता, ‘माझ्या वाढदिवसाची कोणतीही योजना नाही. माझी बहीण अर्पिता गर्भवती आहे, म्हणून मी तिच्याबरोबर वेळ घालवणार आहे आणि अर्पिताने आपल्या भावाला वाढदिवसानिमित्त एक खास गिफ्ट दिले आहे.

अर्पिता आणि आयुष शर्मा यांच्या घरी एका गोंडस मुलीचं आगमन झाले आहे. अर्पिता आणि आयुष शर्माला अहिल नावाचा एक मुलगा आहे. आणि आता मुलीचे नाव अयात ठेवण्यात आले आहे. बाळाच्या आगमनाने खान कुटुंबियांचाही आनंद द्विगुणित झाला आहे. सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम अहिलवर करतो.मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.

आयुष शर्मा आणि अर्पिताने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी प्रसार माध्यमांचे देखील आभार मानले आहेत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. अर्पिताने खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्टीत राजकीय घराण्याचा वारसदार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/