हद्दपार गुन्हेगारास एलसीबीकडून अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. शोयब सलीम पटेल (वय 30, बदाम चौक, खणभाग) असे त्याचे नाव आहे. ऑल आउट ऑपरेशन वेळी ही कारवाई करण्यात आली.

हद्दपार केलेले गुन्हेगार या जिल्ह्यात फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, नीलेश कदम यांचे पथक सांगली शहरात गस्त घालत होते.

शोयब पटेल हा मटकाबुकी असल्याने त्याच्यावर कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो परवानगीशिवाय सांगलीत फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त

या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय

मनशांतीसाठी सहज करता येतील ‘हे’ सोपे आणि घरगुती उपाय