Aruna Bhatia Death | अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन, अभिनेता म्हणाला – ’आज मी असह्य वेदनांमध्ये आहे…’

मुंबई : Aruna Bhatia Death | अक्षय कुमार (Akshay Kumar) ची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia Death) यांचे निधन झाले आहे. बुधवारी (8 सप्टेंबर) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षय कुमारने ही दु:खद बातमी स्वत: सोशल मीडियाद्वारे (Social Media) चाहत्यांना दिली. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अक्षय काही दिवसापूर्वीच आईला भेटण्यासाठी भारतात परतला होता.

आजारी असलेली आपली आई अरुणा भाटिया यांच्यासाठी एक दिवस अगोदर चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती अक्षयने केली होती.

आता अक्षयने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, ती माझ्या जीवनात सर्वात महत्वाची होती. आज मी असह्य वेदनेत आहे : माझी आई अरुणा भाटिया हे जग सोडून गेली आहे आणि आता ती पप्पा सोबत आली आहे. आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे, कारण आता आमचे कुटुंब या कठिण काळाला तोंड देत आहे.

अरुणा भाटिया यांची प्रकृती मागील खुप दिवसांपासून नाजूक होती आणि याच कारणामुळे त्यांना मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कुटुंबाच्या विनंतीनंतर हॉस्पिटलने अरुणा भाटिया यांच्या उपचाराची माहिती गुप्त ठेवली आहे. शुक्रवारी सायंकाळी अक्षयच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अक्षय कुमार आपल्या आईच्या अतिशय जवळ आहे. वृत्त समजताच अक्षय लंडनहून मुंबईत परतला.

अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला आहे. अक्षयने
मंगळवारी आपल्या चाहत्यांना विनंती केली होती की, माझ्या आईच्या प्रकृतीच्या चिंतेत तुम्हा सर्वांना पाहून मी भावनिक झालो आहे. ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कठिण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा

DL-RC | ड्रायव्हिंग लायसन्स, RC एक्सपायर झाले असेल तर ‘नो टेंशन’ ! आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत राहील व्हॅलिड

Pune Corporation |  पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचे प्रधान सचिवांचे पालिका आयुक्तांना आदेश

Corporator Dheeraj Ghate | महापालिका निवडणुकीचा मार्ग ‘साफ’ करण्यासाठी धीरज घाटे यांच्यावर हल्ल्याचा ‘कट’; एका राजकीय पक्षाच्या तिघांच्या अटकेने शहरात खळबळ, जाणून घ्या ‘अंदर की बात’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aruna Bhatia Death | akshay kumar mother died actor says today i feel unbearable pain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update