अभिनंदनला परत आणण्यासाठी ऊर्जा पणाला लावा : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. तसेच भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडले असून त्यांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन यांना परत आणण्यासाठी आपण आपली पूर्ण उर्जा खर्च करावी तसेच संपूर्ण वेळ द्यावा अशी विनंती केली आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव अजूनही कायम असून देशातील काही राजकीय पक्षांनी त्यांचे कार्यक्रम, बैठका, सभा रद्द केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी भाजपचा ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे, या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हे ट्विट केले आहे.

केजरीवाल यांनी केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलावा. आपण एक देश म्हणून आपली शक्ती आणि वेळ ही अभिनंदन यांना परत आणण्यासाठी खर्च करणे गरजेचे आहे. यासोबतच पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घेण्याचेही आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.