Asaduddin Owaisi on Raj Thackeray | भाजपमध्ये कधी जाणार हे राज ठाकरेंनी सांगावं – असदुद्दीन ओवैसी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Asaduddin Owaisi on Raj Thackeray | एमआयएमवर (MIM) भाजपची ‘बी’ टीम म्हणून अनेकवेळा टीका केली जाते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही दोन्ही सभांमध्ये भाजपवर टीका केली नसल्यामुळे मनसेसुद्धा भाजपची ‘सी’ टीम झाली असल्याची टीका सत्ताधारी पक्षाने केली. अशातच यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आपली प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी ही मिलीभगत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते. याबाबत बोलताना, ते कसं म्हणाले मला माहिती नाही मात्र राज ठाकरेंनी ते भाजपमध्ये (BJP) कधी जाणार आहेत हे सांगावं, असं असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi on Raj Thackeray) म्हणाले.

 

महाराष्ट्रात दोन भावांचे भांडण सुरु झालं असून दोन भावांच्या या भांडणात माझंही नाव घेतलं जात आहे. परंतु ही भावा – भावाची भांडणे त्यांनीच बसून सोडवली पाहिजेत, असं म्हणत ओवैसी यांनी मनसे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी बोलताना ओवैसी यांनी मनसेला एक सल्ला दिला.

 

दरम्यान, तुमच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे, तेव्हा आता शांतता राखण्याची जबाबदारी पाळा, असा सल्ला ओवैसींनी दिला आहे. 1 मे ला राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा होत आहे तर नांदेडमध्ये (Nanded) ओवैसींची सभा होणार आहे.

 

Web Title :- Asaduddin Owaisi on Raj Thackeray | Raj Thackeray should tell when he will join BJP Asaduddin Owaisi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा