#Surgicalstrike2 : एअर स्ट्राईकचे एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी केले स्वागत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या हवाई दलाने पाक व्याप्त कश्मीरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ३२० दहशतवादी ठार केले आहेत. याच पार्श्वभूमीवर एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी भारताच्या हवाई हल्ल्याचे स्वागत केले आहे. त्यात त्यांनी भारतीय वायुसेनेच्या शौर्याचे अभिनंदन देखील केले आहे.

कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात भारतीय लष्करालाचे ४२ जवान शहीद झाले. त्यानंतर १२व्या दिवशी भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले आणि शहिदांच्या हौतात्म्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्याचे सर्वच स्तरातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसींनी आपले मत व्यक्त केले आहे.

भारताने आज केलेल्या कार्यवाहीचे मी स्वागत करतो. तसेच भारताने आता पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्या बद्दल सतर्क राहिले पाहिजे असे मला वाटते. त्याच प्रमाणे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या शैतानी विचारांचा मी निषेध करतो असे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री