Ashish Shelar | ‘अरे, बेक्कल…’ सावरकरांचा धडा वगळल्याप्रकरणी आशिष शेलारांचे काँग्रेसवर टीकास्त्र, ठाकरेंचे नाव घेत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस सरकारने (Congress Government) भाजपने (BJP) आणलेला धर्मांतर विरोधी कायदा (Anti-Conversion Act) रद्द केला आहे. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा धडाही (Savarkar Lesson) अभ्यासक्रमातून वगळला आहे. यानंतर भाजपकडून (BJP) यावर सडकून टीका होत आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आशिष शेलारांनी (Ashish Shelar) निशाणा साधला.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असं आशिष शेलार म्हणाले. ते पुढे म्हणाले, अरे, बेक्कल काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही, आशिष शेलारांनी (Ashish Shelar) ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी ‘उबाठा’ आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? काँग्रेसच्या असल्या 60 वर्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय! तर काँग्रेसला साथ देणाऱ्या ‘उबाठा’ला आमदारांनी शिवसेनेतून (Shivsena) वगळलेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच उबाठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांना धडा शिकवेल! असा हल्लाबोलही शेलार यांनी केला आहे.

फडणवीस यांनीही केली टीका

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, माझा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न (Karnataka Pattern) आणणार म्हणत आहेत तो हाच पॅटर्न आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Veer Savarkar) नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत, असंही ते म्हणाले.

Web Title :  Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticized on savarkar chapter removed from the chapter in karnataka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अट्टल गुन्हेगार विवेक यादव याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

Data Hack By Android Apps | अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांचा डेटा होतोय चोरी; ‘हे’ ॲप्स लगेचच करा डिलीट

Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश