‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हाला मिळाली RJD-JDU ची ‘साथ’, बिहारचे मंत्री अशोक चौधरी बोलले ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच रोज काहीना काही होत आहे. जेडीयू मधील अंतर्गत कलह शांत झाला नव्हता तेच काँग्रेसमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत असलेले मतभेद नेत्यानकडूनच बाहेर यायला सुरुवात झाली आहे. याबाबत जेडीयू नेता आणि बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले अशोक चौधरी यांनी सिन्हा यांची बाजू घेतली आहे. तसेच आरजेडी देखील सिन्हा यांच्या बाजूने उभी असल्याचे दिसून आले आहे.

जेडीयू नेते अशोक चौधरी म्हणाले की, ही काँग्रेसची प्रथा आहे पक्ष केवळ युझ आणि थ्रो यावर काम करतो. अशोक चौधरी म्हणाले की, काँग्रेस आपल्या जुन्या सवयीपासून दूर जात नाही. जेव्हा एखाद्याची आवश्यकता असते तेव्हा ते त्याचा वापर करतात आणि नंतर काढून टाकतात.

सिन्हा भाजप मधून काँग्रेसमध्ये यऊन खूप वेळ निघून गेला तेव्हा काँग्रेसला समजले की सिन्हा यांचा आत्मा आरएसएस मधेच आहे अशा खोचक शब्दात चौधरी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच सिन्हा यांचे राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे देखील चौधरी यांनी यावेळी सांगितले. आरजेडीने देखील सिन्हा यांचे समर्थन करत कृष्णन यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. असे वक्तव्य करणाऱ्यांना पक्षात कोणतेच स्थान नाही म्हणून केवळ अंतर्गत खुन्नस म्हणून असे वक्तव्य केली जात असल्याचे आरजेडीकडून सांगण्यात आले आहे.