
Ashwagandha Benefits | सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या सेवन करण्याची सर्वात चांगली वेळ कोणती?
नवी दिल्ली : Ashwagandha Benefits | बरेच लोक सकाळी किंवा रात्री अश्वगंधाचे सेवन करतात. स्टॅमिना वाढवण्यासाठी लोक रात्रीच्या वेळी अश्वगंधा सेवन करतात. सकाळी अश्वगंधा खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर (Ashwagandha Benefits) आहे. सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्यास काय होते ते जाणून घेऊया.
सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्यास काय होते? Benefits of Eating Ashwagandha on an Empty Stomach
१. तणाव आणि नैराश्य कमी होते
सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाचे सेवन केल्याने कोर्टिसोलची (Cortisol) पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव कमी होतो. मूड सुधारतो. डिप्रेशन किंवा तणावग्रस्त लोकांसाठी लाभदायक आहे.
२. थायरॉईड रुग्णांसाठी फायदेशीर
अश्वगंधा खाल्ल्याने थायरॉईडचा (Thyroid) स्तर नियंत्रणात राहतो. अश्वगंधा थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या दूर करते. थायरॉईडचे रुग्ण दररोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाचे सेवन करू शकतात.
३. इम्युनिटी बूस्ट करा (Immunity Boost)
रोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. सर्व वयोगटातील लोक अश्वगंधाचे सेवन करू शकतात.
४. हार्ट हेल्थ सुधारते (Heart Health)
अश्वगंधामधील अँटिऑक्सिडेंट (Antioxidant) हृदयाला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. हृदयाचे आजार दूर होतात. हृदयाची सूज कमी करते. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. (Ashwagandha Benefits)
५. फर्टिलिटी वाढवा
आयुर्वेदानुसार रोज सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधाचे सेवन केल्यास प्रजनन क्षमता वाढते. यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन पातळी वाढते. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता देखील वाढते.
अश्वगंधा घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? Best Time to Taking Ashwagandha
तणाव कमी करण्यासाठी सकाळी अश्वगंधाचे सेवन करू शकता.
याशिवाय इतर समस्यांवर मात करण्यासाठी सकाळी अश्वगंधाचे सेवन करू शकता.
पण स्टॅमिना वाढवण्यासाठी रात्री अश्वगंधा दुधासोबत घेऊ शकता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Police News | पोलीस प्रोत्साहन भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी
ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टी करप्शनकडून FIR