दीपक कुमारचा ‘सिल्वर’वर निशाणा

जकार्ता : 

आशियाई स्पर्धेत भारताकडून आज दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात झाली. आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकाची कमाई करत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर टाकली आहे. नेमबाज दीपक कुमारने १० मिटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. या पदकाबरोबरच भारताने आशियाई स्पर्धेतील आपले पहिले रौप्य पदक जिंकले.

दीपक कुमारने शेवटच्या प्रयत्नात १०.९ पॉईंट मिळवत आपले रौप्य पदक निश्चित केले. त्याने एकूण २४७.७ गूण मिळवले. या प्रकारात चीनच्या हौरान यांड याने सुवर्णपदक जिंकले. भारताने आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्ण पदक जिंकून चांगली सुरुवात केली. भारताच्या बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. याचबरोबर अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार यांनी भारताला पदक मिळवून दिले. या दोघांनी १० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात कास्य पदक मिळवले.
[amazon_link asins=’B07B7PTPB2,B01F38UBRK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfb1eff7-a464-11e8-9a36-776a15f86201′]

या रौप्य पदकाबरोबरच भारत पदक तालिकेत आठव्या स्थानावर पोहचला आहे. भारताला आता एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य पदक मिळाले आहेत.नेमबाजीत पहिल्या दिवासाची पदकाने केलेली सुरुवात कायम राखत भारताच्या खात्यात अजून पदके येतील अशी आशा आहे.