‘कोरोना’च्या संकटादरम्यानच भारतात पुन्हा वाढला अफ्रीकी स्वाइन तापाचा ‘प्रकोप’, जाणून घ्या लक्षणं आणि उपचाराची पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना वायरस महामारीत भारताच्या आसाममध्ये पुन्हा एकदा आफ्रिकन स्वाइन ताप पसरू लागला आहे. ही बाब गांभीर्याने घेत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आफ्रिकन स्वाइन तापाने ग्रस्त परिसरात सुमारे 12,000 डुक्करांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मे महिन्यात सुद्धा राज्यात सुमारे तीन हजार डुक्कर मारण्यात आले होते.

पशुपालन आणि पशु वैद्यकीय विभागांना देखील प्रभावित क्षेत्रांना संवेदनशील घोषित करण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून निरोगी पशुंना संक्रमणापासून वाचवता येईल आणि राज्यभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आसाममध्ये मे महिन्यात पहिले प्रकरण
आसाममध्ये याचे पहिले प्रकरण मे महिन्यात समोर आले होते. यानंतर आसाम सरकारने राज्यात आफ्रिकन स्वाइन फ्लूचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर 306 गावांमध्ये 2,500 पेक्षा जास्त डुक्करांना मारण्याचे आदेश दिले होते.

कोरोनाशी संबंध आहे का
आसामचे पशुपालन आणि पशु वैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी सांगितले की, या आजाराचा कोविड-19 शी काहीही संबंध नाही. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळने दुजोरा दिला आहे की, हा आफ्रिकन स्वाइन फ्लू (एएसएफ) आहे.

देशातील पहिले प्रकरण
त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आम्हाला सांगितले की, हे देशातील आजाराचे पहिले प्रकरण आहे. राज्य सरकार केंद्राकडून मंजूरी मिळण्यापूर्वी ताबडतोब डुक्करांना मारण्याऐवजी हा घातक संसर्गजन्य आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी इतर उपाय करणार आहे. विभागाकडून 2019 च्या गणनेनुसार डुक्करांची एकुण संख्या सुमारे 21 लाख होती, परंतु आता ती वाढून सुमारे 30 लाख झाली आहे.

काय आहे आफ्रिकन स्वाइन फ्लू
युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर (यूएसडीए)च्या नुसार, आफ्रिकन स्वाइन फ्लू एक अत्यंत संसर्गजन्य आणि घातक वायरल आजार आहे, जो सर्व वयाच्या जंगली डुक्करांना प्रभावित करतो. एएसएफचा मानवी आरोग्यासाठी धोका नाही आणि तो डुक्करांकडून मनुष्यात पसरत नाही.

हा एक भयंकर जीवघेणा आजार आहे. या आजारावर कोणताही लस नाही. हा आजार रोखण्यासाठी एकमेव पद्धत म्हणजे सर्व संक्रमित कळप हटवणे हाच आहे.

एएसएफ जगभरात आढळतो. विशेषता उप-सहारा आफ्रिकेत तो आढळतो. नुकताच, तो चीन, मंगोलिया आणि व्हिएतनामसह युरोपीय संघाच्या काही भागात पसरला आहे. तो संयुक्त राज्यात कधीही आढळलेला नाही.

आफ्रिकन स्वाइन फ्लूची लक्षणे
1 खुप ताप येणे
2 भूख कमी लागणे
3 कमजोरी जाणवणे
4 त्वचेवर लाल डाग येणे
5 कफ, उल्टी, खोकल्याची समस्या होणे
6 श्वास घेण्यास त्रास होणे

आफ्रिकन स्वाइन फ्लू माणसांमध्ये पसरतो का ?
एएसएफ माणसांना प्रभावित करत नाही. यासाठी अमेरिकन कृषी विभागाने यास सार्वजनिक आरोग्यास धोका मानत नाही. हा केवळ डुक्करांना प्रभावित करणारा एक वायरल रोग आहे. डुक्करांच्या मांसाच्या संपर्काच्या माध्यमातून एएसएफ माणसापर्यंत पोहचू शकत नाही.