‘त्या’ सहायक पोलीस निरीक्षकाला नियंत्रण कक्षाशी केले संलग्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
होस्टेल मध्ये राहण्यास असलेल्या आयटीच्या तरुणीचा विनयभंग झाला असताना हिंजवडी पोलिसांनी गाफीलता दाखवली. आरोपीला शोधण्याचे काम करण्याऐवजी पीडितानाच त्रास देण्याचे काम केले. यामध्ये संबंधीत सहायक पोलिस निरीक्षकानी हालगर्जीपणा केल्याच्या ठपका ठेवत आज त्यांना तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला सलग्न केले आहे. तसेच त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
हिंजवडी आयटी पार्क मध्ये काम करणारी एक तरुणी होस्टेलवर राहत आहे. रात्री काम करून तरुणी होस्टेलवर आली होती. त्यानंतर ती कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकायला गेली. त्यावेळी बाहेरून एक तरुण आत घुसला आणि तिचा विनयभंग केला.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d1ce9f0-c0cc-11e8-9d7b-956cad925446′]
याचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले. त्याअनुषंगाने पाहणी करत असताना तो तरुण पुन्हा त्या परिसरात आला. त्यावेळी पोलीसाना याची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारदारांनाच आरोपीला शोध घेण्याचा सल्ला दिला. तक्रारदारांनी पाठलाग केला मात्र तो सापडला नाही.
तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता चार तास थांबवून ठेवले.

Pune : पु. ल. देशपांडे उद्यानात साकारणार कलाग्राम

संबधीत तरुणीने वकिलामार्फत पोलिसांशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे हा प्रकार पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन यांच्या लक्षात आला व त्यांनी त्या प्रकरणाचा तपास केला. पीडित तरुणींशी स्वतः भेटून संबंधीत अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. याच प्रकारे हिंजवडी पोलिसांकडून तक्रारदाराना वागणूक मिळत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे यांना तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला सलग्न केले आहे. तसेच या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.