मनसेचे विधानसभेत २ आकडी आमदार ! राज ठाकरेंबद्दल ज्योतिषांचं भाकित

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचे निकाल अजून लागलेले नाहीत तोच महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केलेली दिसत आहे. यातच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील विधानसभेची तयारी सुरु केलेली दिसून येत आहे. २०१४ साली झालेल्या प्रचंड मोठ्या पराभवानंतर राज ठाकरेंनी या निवडणुकीची जोरात तयारी सुरु केलेली दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार न देता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घेतलेल्या प्रचारसभा त्याचेच एक पाऊल होते. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात घेतलेला शेतकरी मोर्चा असो. आता त्यातच राज ठाकरेंना एक दिलासा देणारी घटना समोर आली आहे. आगामी विधानसभेत मनसेला दोन आकडी जागा मिळतील अशी भविष्यवाणी ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मराटकर यांनी केली आहे. त्यामुळे मनसेला यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच राज ठाकरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर जाऊन निवडणूक लढवतील असंही त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर भाजपला बहुमत मिळणार नाही, मात्र नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मागील काही दिवसात शनीचे भ्रमण रवी समोरुन होत असल्याने २१०४ ते १९ या काळात त्यांना विशेष यश मिळू शकले नाही, पण पुढे रवी समोरुन गुरु जाणार असल्याने याचा त्यांना नक्कीच फायदा होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मनसेचे दोन आकडी आमदार दिसणार, प्रत्यक्ष किती आणि कोण होणार हे आत्ता सांगू शकणार नाही पण पुढे निवडणुका जाहीर होताच ते ही बघू, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना चांगले दिवस येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंना खरंच या सगळ्याचा फायदा होणार का ? हे येणारा काळच ठरवणार आहे.

You might also like