अंक ज्योतिष 18 फेब्रुवारी : मूलांकानुसार ‘लकी’ नंबर आणि ‘शुभ’ रंग, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन  – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
काम होण्यास उशीर होऊ शकतो. आज तुम्ही वैवाहिक सोहळ्यात सहभागी होऊ शकता आणि आनंदी रहाल. प्रेमसंबधाचे आज विवावाहत रूपांतर होईल. अनुभवी व्यक्ती आणि ज्येष्ठांकडून चांगला सल्ला मिळेल.
शुभ अंक – 12
शुभ रंग – पिवळा

अंक – 2
जोशात येऊन निर्णय घेऊ नका. तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे. संगीत आणि कलेतील रूची तुम्हाला कौतूकास पात्र ठरवेल. कुटुंबात सर्व आनंदी राहतील.
शुभ अंक-11
शुभ रंग- काळा

अंक – 3
विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. थांबलेली कामे वेग पकडतील. सोशल मीडियावर वेळ घालवाल. परदेश यात्रा करू शकता. विवाहित लोक नव्या समस्येत पडू शकतात.
शुभ अंक-17
शुभ रंग – क्रीम

अंक – 4
सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य कमजोर राहू शकते. कटुंबात अशांतता राहू शकते. आई आणि भावाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी संयम बाळगा. व्यापारात मोठी ऑर्डर मिळू शकते. संकटात मित्र उपयोगी पडतील.
शुभ अंक – 11
शुभ रंग – सफेद

अंक – 5
आपली दिनचर्या व्यवस्थित करावी लागेल. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. पती-पत्नीत मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. बॉस आज खुश होऊन प्रमोशन करू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहिल.
शुभ अंक – 6
शुभ रंग – भूरा

अंक – 6
संततीच्या बाबतीत चांगली बातमी समजू शकते. अंगात ताप राहू शकतो. तुमची अधुनिक विचारधारा चांगली संधी देईल. कम्पुटर, इंटरनेट, सोशल मीडियाशी संबधित जातकांसाठी आजच्या दिवशी अनेक आव्हाने समोर येतील.
शुभ अंक – 15
शुभ रंग – काळा

अंक – 7
तुम्हाला कुटुंबाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिक स्थिती कमजोर राहिल. व्यापारात मंदीला तोंड द्यावे लागेल. कोर्ट-कचेरीला तोंड द्यावे लागेल.
शुभ अंक 12
शुभ रंग – लाल

अंक – 8
एखादे नवीन काम शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता. नातेवाईकांच्या माध्यमातून नोकरी मिळू शकते. प्रेमात अपयश आणि तणाव राहिल.
शुभ अंक – 22
शुभ रंग – क्रीम

अंक – 9
तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. आज तुमची सर्व कामे मोबाईलवरूनच मार्गी लागतील. नव्या मित्रांच्या भेटीने मन हलके होईल. कम्पुटरशी संबंधित जातकांना कार्यात नवी दिशा मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
शुभ अंक – 1
शुभ रंग – डार्क रेड

You might also like