Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | ‘या’ योजनेतून सुमारे 40 लाख लोकांना मिळाली नोकरी! मोदी सरकारनं संसदेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | कोरोना महामारीमुळे मागील दिड-दोन वर्षात लाखो लोकांच्या नोकर्‍या (Job Loss) गेल्या. यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ईपीएफओ (EPFO) ची वेज सबसिडी स्कीम (Wage Subsidy Scheme) काही प्रमाणात भरपाई करण्यात यशस्वी ठरल्याचा दावा सरकारने केला आहे. (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana)

 

सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana) आता सुमारे 40 लाख लोकांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. सरकारने संसदेत या आठवड्यात याबाबत माहिती दिली.

 

मंत्र्यांनी संसदेत सादर केली आकडेवारी

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी संसदेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देत याचे आकडे सादर केले.

मंत्र्यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेद्वारे 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत एकुण 39.59 लाख लोकांना नोकर्‍या दिल्या गेल्या आहेत. या लोकांना 1.16 लाख प्रतिष्ठानांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपबल्ध करून देण्यात आली आहे.

 

आत्मनिर्भर भारत पॅकेजचा भाग आहे की स्कीम
अर्थमंत्री निर्मला सीतारमन (FM Nirmala Sitharaman) यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा केली होती. ही योजना आत्मनिर्भर भारत पॅकेज (Atmanirbhar Bharat Package) चा भाग आहे.

तिचे लक्ष्य कोरोनाने प्रभावित अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या नवीन संधी तयार करणे आहे. सरकार या अंतर्गत कंपन्यांना नवीन हायरिंगवर सबसिडी (Subsidy on New Hiring) देते. ही सबसिडी दोन वर्षांसाठी आहे आणि ती पीएफ फंड (PF Fund) मध्ये दिली जाते.

 

अशा कंपन्यांना मिळतो सबसिडीचा लाभ
या योजनेचा लाभ प्रत्येक ती कंपनी घेते, जी ईपीएफओ (EPFO) कडे रजिस्टर्ड आहे.
तिचा लाभ घेण्यासाठी 50 पेक्षा कमी कर्मचार्‍यांच्या कंपनीला किमान दोन नवीन लोकांना नोकरी देण्याची अट आहे.
अशाप्रकारे 50 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या कंपनीला सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी किमान पाच नवीन लोकांना नोकरी द्यावी लागेल.

 

पीएफ फंडात दिली जाते इतकी सबसिडी
ज्या कंपन्यांमध्ये एकुण कर्मचारी संख्या एक हजारपर्यंत आहे, त्यांना सरकार दुप्पट सबसिडी देते.
अशा कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या वेतनाचा 24 टक्के भाग सबसिडीच्या रूपात मिळतो.

 

यामध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघांच्या हिश्श्यातील 12-12 टक्के पीएफ काँट्रीब्यूशनचा (PF Contribution) समावेश असतो.
एक हजारपेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या कंपन्यांना 12 टक्के सबसिडी दिली जाते. ही सबसिडी सरकारकडून दोन वर्षांसाठी दिली जात आहे.

 

Web Title :- Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | around 40 lakh got job epfo wage subsidy scheme atmanirbhar bharat rojgar yojana modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

New Feature in Gmail | Gmail मध्ये आले ‘हे’ शानदार फीचर, आता यूजर्स चॅटसोबत करू शकतात Audio आणि Video कॉल

Omicron Symptoms in kids | जास्त ताप-सतत खोकला, मुलांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची ही 6 विशेष लक्षणं; जाणून घ्या

Sitaram Kunte | अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी, जाणून घ्या नेमकं काय झालं?