मतदानावरुन सेनेत ‘वाद’ ; ‘त्या’ उपजिल्हा प्रमुखावर ‘अट्रॉसिटी’चा गुन्हा

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे यावरुन शिवसेनेच्या नगरसेविका व उपजिल्हाप्रमुख यांच्यात वाद उफाळून आला असून त्यातूनच शिवसेनेच्या नगरसेविका नंदा संदीप कटारे यांच्या फिर्यादीवरून शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख दीपक आसाराम बोरकरसह अन्य एक अशा दोघांविरोधात अट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मतदान करण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कटारे यांनी फिर्याद दिली होती.

‘१३ जून रोजी खा. प्रतापराव जाधव यांचा सत्काराचा कार्यक्रम आटोपून त्र्यंबकनगरमधील घरी परतले असता घरामध्ये मी एकटीच होते. त्यावेळी बोरकर हे घरात आला आणि नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नीला मतदान करायचे, असे सांगितले. त्यावर मतदान कुणाला करायचे हा माझा हक्क आहे, असे कटारे यांनी त्याला सांगितल्याने बोरकरने जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.’

आरोग्यविषयक वृत्त –

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार