गरज भागवण्यासाठी युवक गेला ‘त्या’ वस्तीत, ‘सेक्स’ वर्करवर केला ‘हल्ला’ अन् ‘संपवलं’ तिच्या प्रियकराला

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन : भिवंडी शहरातील हनुमान टेकती परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वेश्यावस्तीत प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या वारांगनावर जीवघेणा हल्ला करत तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली. वेश्यागमनाच्या बहाण्याने तिच्या घरी थांबलेल्या ग्राहकानेच त्याच्या दोन साथीदारांसह मिळून वारांगणाच्या दागिने व पैश्यांच्या हव्यासापोटी तिच्यावर हा हल्ला केला. आरोपींनी वारांगनाच्या प्रियकराच्या डोक्यात वरवंटा घालून त्याला जागीच ठार मारले. या घटनेत वारंगना गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

काशिनाथ नायक (५०) असे मृत प्रियकराचे नाव असून अनुसया (४५) असे या जखमी वारंगनाचे नाव आहे. याप्रकरणी कासीम उर्फ शहनेशाह रशीद अली शेख (वय-२९,) शिवानी रवी राठोड (३०) आणि तृतीयपंथी फिरोज उर्फ फिरोजा अब्दुल अजीम शेख (३०) या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, ६ डिसेंबर रोजी सकाळी उशिरापर्यंत घराबाहेर कोणीही न आल्याने शेजारी राहणाऱ्या चंद्रकला हेगडे यांनी घराज दरवाजा लोटून आत पहिले तर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती भिवंडी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होतात जखमी अवस्थेत असणाऱ्या अनुसया यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे .

पोलिसांनी केलेल्या तपासात घटनेच्या रात्री आरोपी महिला व तृतीयपंथी हे दोघे परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हातात पिशवी घेऊन जाताना आढळले. पोलिसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना दाट संशय आला. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर आरोपींनी या प्रकरणाचा खुलासा केला.

पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या तिन्ही आरोपींना अनुसयाने कर्नाटक, वैजापूर या गावी जत्रेला जाण्यासाठी तिने सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करून काही रोख रक्कम जमा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींनी कट रचत ५ डिसेंबरच्या रात्री आरोपी कासीम हा अनुसया हिच्यासोबत वेश्यागमन करण्याच्या बहाण्याने त्या रात्री तिच्या घरी आला. आरोपी कासीमने अनुसयासोबत मद्यप्राशन करून झोपेचे नाटक केले. अनुसयाही नशेत असल्याने तिलाही झोप लागली. तर त्याच घरात दुसऱ्या पंलगावर काशिनाथ झोपला होता. त्यानंतर ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास आरोपीचे साथीदार महिला व तृतीयपंथी यांनी अनुसयाच्या घरात दागिने व रोख रक्कम लुटण्यासाठी आले. घरात दागिने शोधत असतानाच काशिनाथला जाग आली. त्यामुळे कासीम याने घरातील दगडी वरवंटा त्यांच्या डोक्यात घालून त्याला ठार मारले. तर अनुसयालाही जाग आल्याने तिच्याही डोक्यात त्याच वरवंट्याने डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी करून घरातील दागिने आणि रोख रक्कम पळवली.

दरम्यान, तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कासीम हा पोलीस रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी संगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/