देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर देहूरोड येथे घडली.

अरबाज मेहमूद शेख (20, रा. शिवाजीनगर, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर मोबीन उर्फ बुग्गी शेख, संदीप खनसे, विजय खनसे, अमीन शेख, सूर्या, चिक्कू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अरबाज त्याच्या शितळानगर येथे रहाणा-या काकांकडे गेला होता. काकांच्या घरासमोर उभा असताना सर्व आरोपी तिथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून अरबाजला मारहाण केली. बुग्गीने कोयता भिरकावून मारला. अरबाजला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पुंडीचाळ येथे नेले. तिथे चिक्कूने अरबाजच्या हातावर कोयत्याने वार केले. तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

 

Loading...
You might also like