धमक्यानंतरही ना.धो. महानोर राहणार साहित्य संमेलनाला ‘उपस्थित’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शुक्रवारी सकाळी ग्रंथदिडीने सुरुवात होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून कवी ना. धो. महानोर असणार असून त्यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका असा धमकीवजा फोन आला होता. तरीही या धमक्यांना न घाबरता आपण संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचे महानोर यांनी सांगितले आहे.

उस्मानाबाद येथे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन होणार आहे. याबाबत महानोर यांनी सांगितले की, धमकी हा शब्द माझ्या हिशोबात नाही. मला फोन आला होता. तसेच पुण्यातील ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले आहे. नियमानुसार एकमताने दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही.

मी आयोजकांना शब्द दिला आहे. त्यानुसार संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे. महानोर यांना धमकीबाबतचे फोन आल्यानंतर गृह खात्याने त्याची तातडीने दखल घेऊन गुरुवारपासून त्यांना सुरक्षा पुरविली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/