अतुल कुलकर्णी सांगतोय यामुळे केली जाते राजकीय जाहिरातबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी ज्याने मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटादेखील आपले नाव कमावले आहे. त्याने नुकतेच सोशल मिडियावर ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतुलने या व्टिटमध्ये राजकीय जाहिरातबाजी का केली जाते याविषयीचे आपले मत मांडले आहे.

सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. अनेक नेते आपला-आपला प्रचार जोरदार करत आहे. यानिमित्त नेते मंडळी याच दिवसात मनमोकळ्यापणाने मतदाराशी संवाद साधत आहे. तसेच जाहीरातीच्या माध्यामातून आपल्या पक्षाचा प्रचार करत आहे. याविषयी अभिनेता अतुल कुलकर्णी याने ट्विटमध्ये आपले मत मांडले आहे.

त्याने ट्विटमध्ये असे लिहले की, ज्यांचा स्वतःवर कमी विश्वास असतो. अशा लोकांसाठी जाहिराती असतात. आपले ठाम मत नसलेल्या लोकांना समोर ठेवूनच या जाहिराती बनवल्या जातात. एकाच मतावर टिकून न राहता सतत वेगळी दिशा शोधणाऱ्या लोकांसाठी या जाहिराती असतात. दिनहिन लोकांना सुचना देण्यासाठी या जाहिराती बनवल्या जातात. माझ्या एका जाहिरात क्षेत्रात असलेल्या दिग्गज मित्रासोबत चर्चा करुनच मी या निष्कर्षावर पोहचलो आहे. त्याच्यासोबत चर्चा केल्यानंतर मी हा निष्कर्ष काढला असला तरी मला देखील या गोष्टी पटल्या आहेत. माझ्या या मित्राचे नाव रंजन मलिक असून तो जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आहे.

अभिनेता अतुल कुलकर्णी सध्या सिटी ऑफ ड्रिम ही त्याची वेबसिरीज प्रेक्षकांना पहायला मिळत असून विशेष म्हणजे या वेबसिरीजमध्ये त्याने एका राजकारणातील भूमिका साकारली आहे. त्याने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’ या आगामी चित्रपटाचे लेखन केले आहे. अभिनयासोबत आता अतुल एका वेगळ्या क्षेत्राकडे वळला आहे.