कलम 370 : … म्हणून 5 ऑगस्ट आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे तर काळा दिवस, मेहबूबा मुफ्तींची मुलगी इल्तिजा

श्रीनगर : वृत्तसंस्था – अयोध्येमध्ये येत्या 5 ऑगस्टला राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हीने केंद्र सरकारवर टीका केली आहे. आमच्यासाठी 5 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याठिकाणी बोलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याला आता एक वर्ष पूर्ण होण्यापुर्वी इल्तिजा मुफ्तीने असे विधान केले आहे.

नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ
केंद्र सरकारने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ केली आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकारने त्यांच्या नजरकैदेत वाढ केली आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर मेहबूबा मुफ्ती या नजरकैदेत आहेत.

5 ऑगस्ट काळा दिवस
आपल्यासाठी 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस नाही. 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. गृहमंत्रालयाने माझ्या आईला का कैदेत ठेवले आहे ? या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही, कारण माझ्या आईच्या मुद्याला नाझीर बनवायचे आहे, असा संदेश तिने दिला आहे. इल्तिजा मुफ्ती यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. तसेच वसीम बारीच्या हत्येचा पुरावा आहे की, 370 हटवल्यामुळे दहशतवाद संपणार नाही, असेही मुफ्तीने म्हटले आहे.