काय सांगता ! होय, IPL मध्ये कोहलीच्या संघात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला ‘कोरोना’ची ‘लागण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, काही खेळाडूंना ही कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. आत्ता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्याचा जलद गोलंदाज केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे केन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. खोकला आणि तापामुळे केनला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचा समोर आले.

IPLवरही कोरोनाचं सावट
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारीच IPL 2020 चे सामने पुढे ढकलण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. कोरोनामुळे IPL 2020 सुद्धा सध्या संकटात सापडलं असल्याचा दिसत आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार IPL 2020 होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर IPL रद्द केलं जाण्याची शक्यताही व्यक्त केलं जात आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया दौरा रद्द
भारत महिला संघाचा आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला आहे . प्रेक्षकांशिवाय ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील सामने हे खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारतातही दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा वन डे सामना रिकाम्या स्टेडियमवर खेळला जाईल.या निर्णयानंतर आत्तापर्यंत विकलेली सर्व तिकिटे परत केली जाणार आहेत.