‘या’ 118 वर्ष जुन्या नंबर प्लेटची किंमत ऐकून तुमची झोप उडेल !

पोलीसनामा ऑनलाईनः आतापर्यंत तुम्ही महागड्या लक्झरी (Expensive luxury) गाड्याविषयी ऐकले असेलच. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा नंबर प्लेट बद्दल (number plate) सांगणार आहोत. ज्याचा लिलाव एक कोटीपेक्षा अधिक किंमतीमध्ये झाला आहे. 1902 च्या या व्हिंटेझ नंबर प्लेटचा लिलाव युकेमध्ये 128, 800 पौंड म्हणजेच 1.26 कोटी रुपयांमध्ये झाला आहे. या नंबर प्लेटची किंमत जगातील काही महागड्या स्पोर्टस कारपेक्षा अधिक ( More than an expensive sports car) आहे. मात्र या नंबर प्लेटमागची एक वेगळी गोष्ट आहे.

या नंबर प्लेटमागे आहे दशकाची गोष्ट
सुरुवातील सन 1902 मध्ये ही नंबर प्लेट खरेदी केली होती. ही नंबर प्लेट फक्त संख्या व प्लेट बद्दल नसून यात दशकाची गोष्ट लपलेली आहे. प्लेट पहिल्यांदा बर्घिममध्ये विकली होती. ज्याची खरेदी चार्ल्स थॉम्पसन नावाच्या एका व्यक्तीने केली होती. त्याकाळी ऑटोमोबाईल फारच दुर्मिळ गोष्ट होती. ही नंबर प्लेट खूपच वेगळी होती. ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट लागायची ते वाहन लोक नेहमी लक्षात ठेवत असत.

1955 मध्ये चार्ल्स याचे निधन झाल्यानंतर ही नंबर प्लेट बेरी थॉम्पसन यांना देण्यात आली. बॅरी यांचे 2017 मध्ये निधन झाले. ही प्लेट त्यांनी जग्वार ऑस्टिन ए. 35, मिनी अ‍ॅड फोर्ड कोर्टीनावर लावून वापरली होती. या प्लेटच्या Silverstone Auctions द्वारे नुकताच लिलाव करण्यात आला. ही प्लेट खरेदी करणा-यांचे नाव गुप्त ठेवले आहे. मात्र ज्या किंमतीत या प्लेटची विक्री झाली. त्यावरून लोक वेगवेळी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.