व्हायरल फ्लूपासून वाचण्यासाठी ‘हे’ 5 खाद्यपदार्थ टाळा, सर्दीपासून देखील मिळेल सूटका, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    सध्याच्या बदलत्या हवामानामुळे बरेच लोक सर्दी – खोकला, विषाणू आणि फ्लूने ग्रस्त आहेत. या हंगामात ॲलर्जीचा धोका वाढतो तसेच ताप आणि शरीरदेखील कमकुवत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात काही पदार्थांपासून अंतर ठेवले तर आजाराचा धोका कमी होतो. बदलत्या हंगामात संसर्गाचा धोका कमी करायचा असेल तर लोकांनी त्यांच्या अन्नाची विशेष काळजी घेतली पाहिजे.

१) दुग्धजन्य पदार्थ

तज्ज्ञांच्या मते, चीज, दही, मलई तसेच दुधही यावेळी घेऊ नये. हिवाळ्याच्या हंगामात किंवा बदलत्या वातावरणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. कारण यामुळे घशात आणि छातीत म्युकस तयार होतात.

२) तळलेले अन्न

थंड हवामानात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. यामध्ये अती प्रमाणात चरबी असते जे पचविणे अवघड आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे लोकांमध्ये बरीच समस्या उद्भवू शकतात. त्यापैकी अतिसार आणि अपचन ही मुख्य समस्या आहे. म्हणून बदलत्या हंगामात हे पदार्थ टाळले पाहिजेत

३) बेरी

ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरीसारखी फळे थंड हवामानात टाळली पाहिजेत. तज्ज्ञांच्या मते, हा बेरींचा हंगाम नाही, म्हणून या हंगामात सापडलेल्या बेरींमध्ये पोषक तत्वांचा अभाव असू शकतो.

४) शतावरी

थंड हवामानात शतावरी टाळणे चांगले होईल, कारण यावेळी आढळणार्‍या शतावरीची गुणवत्ता इतकी चांगली नसते तसेच ते थंड हवामानात आढळतात. परंतु त्यामध्ये चव आणि पोषक तत्वे कमी प्रमाणात आढळतात.

५) कॅफिनयुक्त पदार्थ

प्रत्येकास हिवाळ्याच्या काळात गरम चहा किंवा कॉफीचा आनंद घ्यायचा असतो. परंतु आरोग्य तज्ज्ञाच्या मते या काळात जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पेय सेवन केल्यामुळे लोकांना वारंवार लघवीचा त्रास होऊ शकतो. कारण कॅफीन लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. यामुळे शरीरात डिहाइड्रेशन होते. यामुळे घशात कोरडेपणा जाणवतो तसेच नाक आणि घशात इन्फेक्शन होऊ शकते.