8 वर्षात इतकी बदलली सलमानची ‘ही’ हिरोईन की ओळखणंही झालं अवघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टार्जन द वंडर कार या सिनेमातू डेब्यू करणारी आणि अनेक अवार्ड आपल्या नावावर करणारी अभिनेत्री आयशा टाकिया मोठ्या कालावधीनंतर स्पॉट झाली आहे. टार्जन नंतर आयशाने असे अनेक सिनेमे केले आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. आयशाने लग्नाचा निर्णय घेतला आणि इंडस्ट्रीपासून अंतर बनवून ठेवले आहे.

खूप मोठ्या कालावधीनंतर आयशा तिचा मुलगा मिकाईलसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. तिने आपल्या मुलाला स्ट्ऱ़ॉलरवर बसवून ठेवले होते. फोटोग्राफर्सना पाहून आयशाचा मुलगा मिकाईल देखील पेपराजींचे फोटो काढू लागली.

लुक्सबाबत बोलायचे झाले तर, यावेळी आयशा लुकमध्ये दिसून आली. आयशाने ब्लु जिन्ससोबत ग्रे कलरचा टीशर्ट घातला होता. सध्या आयशा सिनेमातून दूर रहात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

आयशा शेवटचे मोठ्या पडद्यावर 2011 मध्ये दिसली. मोड असं या सिनेमाचं नाव आहे. यानंतर तिने कोणताही सिनेमा साईन केला नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा आयशा 4 वर्षांची होती तेव्हाच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 2000 मध्ये आयशाने फाल्गुनी पाठकच्या अल्बममधील मेरी चुनर उड उड जाए या गाण्यात काम केलं होतं. या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने सलमान सोबत वॉन्टेड या सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. परंतु या सिनेमाच्या हिट होण्याचा फायदा मात्र तिला नाही झाला.

आयशाच्या लुकमध्ये कमालीचे बदल झाल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार, आयशाने लिप्स, जॉ लाईन, आयब्रो फोरहेड ची सर्जरी केली आहे. तिचा नवीन लुक जेव्हा समोर आला होता तेव्हा सोशलवर तिला खूपच ट्रोल करण्यात आले होते. आयशाने ही गोष्ट कधी मान् केली नाही परंतु तिचे फोटो सर्व काही सांगून जातात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like